वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराजवळच उभ्या असलेल्या ज्ञानवापी मशिदी प्रकरणी कोर्ट कमिश्नर अजय मिश्रा यांना हटवण्यात आले आहे. तसेच सर्व्हेचा अहवाल सादर करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. वाराणसी सत्र न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
शिवलिंग सापडलेली जागा सील
आज सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येत आहे. या तीन दिवसांच्या सर्वेक्षणात हजारो फोटो आणि व्हिडिओग्राफ पुरावे म्हणून गोळा करण्यात आले आहेत. बुधवार, १७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने कमिश्नर हे सर्व पुरावे सादर करणार होते, मात्र सहाय्यक आयुक्तांनी सकाळीच अहवाल अद्याप पूर्ण झाला नसून अहवाल पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. यावर वाराणसी न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. वाराणसी न्यायालयाने कोर्ट कमिश्नर अजय कुमार मिश्रा यांना हटवण्यात आले आहे. तर विशाल सिंह आणि अजय सिंह प्रताप हे टीमचा हिस्सा असून त्यांना सर्व्हेचा अहवाल सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. दोन दिवसांनंतर न्यायालयात ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश वाराणसी सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर वाराणसी सत्र न्यायालयात बुधवारी दोन याचिकांवर सुनावणी होणार आहे. शिवलिंग सापडलेली जागा सील केल्यानंतर नमाज पठण करणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाईप दुसरीकडे लावण्यात यावा जेणेकरुन वाझु होऊ शकेल. तसेच तलावातील मासे आणि नमाज पठण करणाऱ्यांसाठी शौचालयाची व्यवस्था, या दोन मुद्द्यांवर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. अजय कुमार मिश्रा यांच्यावर गोपनीय माहिती उघड केल्याचा आरोप आहे. या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने मिश्रा यांची हकालपट्टी केली आहे, असा आरोप कोर्ट कमिश्नर विशाल सिंह यांनी केला आहे.
(हेही वाचा औरंग्याच्या थडग्याचा उद्धार, पण महाराणी ताराराणींच्या समाधीची उपेक्षा! छत्रपतींच्या महाराष्ट्रात चाललंय काय?)
Join Our WhatsApp Community