गडचिरोलीत पकडलेला वाघाचा बछडा आता कायमचा नजरकैदेत?

179

गडचिरोलीत आमरेली तालुक्यात लागोपाठ दोन जणांना मारणाऱ्या वाघाच्या बछड्याला दीड दिवसांच्या आत वनविभागाने जेरबंद केले. मात्र या पंधरा महिन्याच्या नर बछड्याला पुन्हा जंगलात सोडणे कठीणच असल्याचे वन्यजीव अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. दोन्ही माणसांना शेतात या बछड्याने मारले. चोवीस तासांच्या आत दोन माणसांचा बळी घेणा-या वाघाला पुन्हा जंगलात सोडणे नव्याने मानव-प्राणी संघर्ष उभा करेल, अशी भीती वन्यजीव अभ्यासक करत आहेत.

( हेही वाचा : राज्यात दिवसभरात २६६ कोरोना रुग्णांची नोंद)

बछड्याची रवानगी नागपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात

सलग दोन घटनांमध्ये वाघाच्या बछड्याने ज्या पद्धतीने दोन्ही माणसावंर हल्ला केला ती पद्धत लक्षात घेता वाघाच्या बछड्याला पुन्हा जंगलात सोडण्याचा निर्णय चुकीचा ठरेल, असे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. सोमवारी सायंकाळी वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद केले गेले. मंगळवारी सकाळी वाघाच्या बछड्याची रवानगी नागपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात केली गेली. मात्र तो रात्रभर पिंज-याला धडक देत होता. लहान वयातच त्याच्या स्वभावातील आक्रमकता पाहता त्याच्याजवळ माणसांचा संपर्क आल्यास पुन्हा विपरित घडू शकते. शक्यतो दोन वर्षांपर्यंत बछडे आईच्या सहवासात शिकार करण्याची पद्धत शिकून घेतात. हल्लेखोर वाघ दोन वर्ष पूर्ण होण्याअगोदरच आईपासून दूरावला. या दोन्ही घटनाक्रम लक्षात घेत लहानपणापासूनच त्याने आईकडून मिळालेल्या शिकारीतून माणसांचे मांस अगोदरच खाल्ले असावे ही शक्यता नाकारता येत नसल्याची माहितीही वन्यजीव अभ्यासकांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.