कोकणची लाइफलाइन असलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच नाव द्यावे या मागणीसाठी मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने तालुका पातळीवर तहसीलदारांना निवेदने देण्यात आली. मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष गजानन नाईक आणि उपस्थित पत्रकारांच्या हस्ते सावंतवाडी येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सर्व तालुक्यात हे निवेदन पत्रकारांनी दिले.
सरकारने तातडीने निर्णय घ्यावा
पत्रकारांनी सातत्याने सहा वर्षे रस्त्यावर उतरून लढा दिल्यानंतर आणि दिल्लीपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. काम रखडलयानंतर देखील वेळोवेळी पत्रकारांनी पाठपुरावा केला होता. बाळशास्त्री जांभेकर हे कोकणचे सुपूत्र आहेत आणि पत्रकारांमुळे हा महामार्ग होत असल्याने बाळशास्त्रींचे महामार्गाला नाव देणे औचित्यपूर्ण ठरणार असल्याने सरकारने तातडीने तसा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
(हेही वाचा – मुंबई पोलिसांचा आणखी एक ‘वाझे’! रेट कार्डसह तपशील आला समोर )
विविध प्रकल्पांना राजकीय नेत्यांची नावे तर…
विविध प्रकल्पांना राजकीय नेत्यांची नावे दिली जात असतात. अशा स्थितीत मुंबई – गोवा महामार्गाला एक पत्रकार, विचारवंत, समाजसुधारक असलेल्या बाळशास्त्रींचे नाव देऊन औचित्य साधावे, असे आवाहनही पत्रकारांनी केले आहे
Join Our WhatsApp Community