शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जी सध्या मुंबईतील भायखळा तुरुंगात आहे. शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी ती गेल्या साडेसहा वर्षांपासून कारागृहात आहे. शीना बोरा हत्याकांडात तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. साडे सहा वर्षांनंतर हा जामीन मंजूर होत असल्याने तिला दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने दिले सुटकेचे आदेश
इंद्राणी मुखर्जी गेल्या ६ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे, त्या आधारावर न्यायालयाने तिची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. इंद्राणीने असा युक्तिवाद केला होता की, तिचा खटला सहा वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. त्यामुळे आत्ता या खटल्यावर लवकर कोणताही निर्णय येण्याची शक्यता नसल्याचेही सांगितले जात आहे.
यावेळी अनेकदा इंद्राणी मुखर्जीला तिचा जामीन फेटाळण्यात आला होता. मात्र मुंबई सत्र न्यायालय, उच्च न्यायालय कोणीही जामीन दिलेला नव्हता. कारण तिच्यावर तिचीच मुलगी शीना बोरा हिची आपला पूर्व पती, ड्रायव्हरच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप होता. यामध्ये तिचा पीटर मुखर्जीचाही सहभाग होता. त्यानंतर याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. दरम्यान, गेल्या तीन वर्षात इंद्राणीने एकही पॅरोल घेतला नाही, या सगळ्या गोष्टी विचारात घेता सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
(हेही वाचा – RSS मुख्यालय परिसराची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला काश्मिरमधून अटक )