दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून अंदमान-निकोबार बेटातून पुढे सरकला. बुधवारी मान्सूनने बंगालच्या उपसागरातील समुद्रातील ईशान्य दिशेकडील काही भाग व्यापला. मान्सूनची वाटचाल श्रीलंकेच्या वेशीपर्यंत दिसून येत असल्याची माहिती भारतीय वेधशाळेने दिली.
गेल्या काही दिवसांपासून अंदमान निकोबार बेट आणि संपूर्ण बंगालच्या उपसागरात जोमाने वारे वाहत आहे. ६० किलोमीटर ताशी वेगासह पावसाचाही सतत मारा सुरु आहे. अंदमान-निकोबार बेटात मंगळवारी २ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली.
(हेही वाचा – मान्सूनची आगेकूच सुरुच…आता २-३ दिवसांत श्रीलंकेत पोहोचणार?)
नजीकच्या पोर्टब्लेअरमध्येही ६ सेमी पाऊस झाला. पुढील तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून श्रीलंकेतही पोहोचेल तसेच बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापत अरबी समुद्रातही प्रवेश करेल, असा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community