आरेतील प्रलंबित मेट्रो ३ कारशे़ड उभारणी प्रकरणात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पुन्हा टार्गेट करण्यात आले आहे. मरोळमार्गे आरेत जाणा-या भिंतींवर अज्ञात व्यक्तींनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या नावे नाराजी व्यक्त करणारे संदेश लिहिले आहेत.
पर्यावरणप्रेमींची दिवसेंदिवस वाढतेय नाराजी
‘आदित्य क्या हुआ तेरा वादा’, ‘आदित्य होश मे आओ’ अशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना साद घालत या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. आरे मेट्रो ३ कारशेडच्या उभारणीवरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जोरदार वाद सुरु आहे. या समस्येचे निराकरण होत नसल्याने पर्यावरणप्रेमींची दिवसेंदिवस नाराजी वाढत चालली आहे. सत्तेत आल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी अद्यापही पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांची भेट घेतलेली नाही.
(हेही वाचा – गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू)
भिंतीवर काय संदेश लिहीला ?
वाढता रोष लक्षात घेत आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणप्रेमींना भेटून भूमिका जाहीर करावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून दर रविवारी मेट्रो कारशेडच्या ठिकाणी जमणा-या कार्यकर्त्यांकडून सातत्याने जात आहे. त्यातच बुधवारी सकाळी आरेतील मरोळमार्गावरील या भिंतीवर आदित्य ठाकरेंच्या नावे संदेश लिहिल्याचे दिसून आले. ‘मेट्रो कारशेड गो बॅक’, ‘रहेगा आरे तभी बचेंगे सारे’, ‘सेव्ह आरे’, ‘आरे वाचवा’, ‘जमीन रो रही है’ असे संदेश भिंतीवर लिहिले होते. मात्र यामागे कोण आहे, हे नेमके कळू शकलेले नाही.
Join Our WhatsApp Community