केंद्रीय केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला, त्यानंतर दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली, त्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री इराणी यांनी थेट सुप्रिया सुळे यांना आव्हान देत, ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती, असे सांगत त्यांनी थेट राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे.
काय म्हणाल्या स्मृती इराणी?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला अमेठीतून लढण्याची संधी दिली आणि मी राहुल गांधींचा पराभव करू शकले. आता ‘ए’ फॉर अमेठी आणि ‘बी’ फॉर बारामती होते, हे शहा जाणतात,’ असे सांगून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पुढचा मोर्चा बारामतीकडे वळवणार असल्याचे संकेत देऊन अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले. शिवानंद द्विवेदी लिखित व ज्योत्स्ना कोल्हटकर आणि प्राची जांभेकर यांनी अनुवादित केलेल्या ‘अमित शहा आणि भाजपची वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन इराणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. ‘अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप मशिन नाही, तर एक मिशन आहे. हेच मिशन हाती घेऊन आम्ही राहुल गांधींच्या अमेठीच्या घरात घुसलो. लोकशाहीद्वारे लढलो आणि त्यांचा पराभव केला. आणि पुन्हा पुन्हा हेच करीत राहू. अमित शहा यांनी आदेश दिला, तर जे अमेठीत घडले ते बारामतीतही होईल. त्यांचा आदेश शिरसावंद्य,’ असे म्हणत स्मृती इराणींनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबीयांना आव्हान दिले.
(हेही वाचा औरंग्याच्या थडग्याचा उद्धार, पण महाराणी ताराबाईंच्या समाधीची उपेक्षा! छत्रपतींच्या महाराष्ट्रात चाललंय काय?)
Join Our WhatsApp Community