श्री गणेश मंदिर संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

134

श्री गणेश मंदिर डोंबिवली येथे गणेश मंदिर संस्थानाचा 98 वा वर्धापन दिन श्री गणेशाची पुजा आणि किर्तन या धार्मिक पद्धतीने विविध कार्यक्रम करुन साजरा केला जाणार आहे. 98 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थानाकडून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी भाविकांनी या कार्यक्रमांस उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गणेश मंदिराचे विश्वस्त प्रविण दुधे यांनी केले आहे.

भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा

दरम्यान, 19 मे गुरुवारी सकाळी 5:30 वाजता श्री गणेशाची पुजा, सकाळी 6:30 वाजता शिवशक्ती याग आणि सायंकाळी 6:30 वाजता शिवतांडव उपासना होणार आहे. तसेच, दिनांक 20 मे रोजी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कीर्तन जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि शनिवारी 21 मे रोजी सायंकाळी 6:30 ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गणेश मंदिर संस्थानच्या विश्वस्तांकडून करण्यात आले आहे.

( हेही वाचा :मुंबईतील माझगावची हवा दिल्लीपेक्षाही वाईट; जाणून घ्या तुमच्या शहरातील हवेची गुणवत्ता)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.