एसटी कर्मचा-यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण आता सदावर्ते यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोलापूरातील दोन प्रकरणांत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
काय आहे प्रकरण
दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मराठा समाजाच्या आंदोलनावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्यावर सोलापूरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे.
सदावर्तेंना झाली होती अटक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर एप्रिल महिन्यात एसटी कर्मचा-यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनाप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना 18 दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता. मराठा आरक्षणावेळी सदावर्ते यांनी वादग्रस्त विधान करत दोन समाजांत तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासाठी त्यांच्यावर सोलापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान आता सदावर्ते काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community