भारताच्या निखतची ऐतिहासिक कामगिरी! अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली महिला बॉक्सर

149

भारताची महिला बॉक्सर निखत झरीन हिने IBA च्या महिला विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत (IBA Women’s World Boxing Championship) ५२ किलो वजनी गटात विजय मिळत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही स्पर्धा तुर्कस्तानातील इस्तनबूलमध्ये सुरू आहे. या स्पर्धेत निखतने सेमीफायनलच्या युद्धात ब्राझीलच्या कॅरोलिन डी अल्मेडा हिचा ५-० असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत थायलंडच्या जुतामास जितपॉंग हिच्याशी निखत हिचा सामना होणार आहे. या मानाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली महिला ठरली आहे.

( हेही वाचा : पेंच टायगर व्याघ्र प्रकल्पात रात्रीची सफारी सुरु पण… )

रौप्य पदक निश्चित

निखतने दमदार कामगिरी केल्यामुले तिने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचे रौप्य पदक निश्चित झाले आहे. तिची आतापर्यंत कामगिरी बघून तिच्याकडून भारतवासीयांना सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. मात्र या स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनिषा मॉन हिचे आव्हान संपुष्टात आले आहे. इटलीच्या इर्मा टेस्टा हिने मनिषाला सहज पराभूत केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.