लांबचा प्रवास करताना आरक्षित तिकीट (Reservation Ticket) नसल्यावर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. अशा परिस्थितीत तात्काळ तिकीट हा एकमेव पर्याय उपलब्ध असतो. परंतु आता चिंता करण्याचे कारण नाही कारण रिझर्व्हेशन नसतानाही तुम्हाला रेल्वे प्रवास करता येणार आहे.
( हेही वाचा : रेल्वे प्रवासाचा दिवस अचानक बदलला, तर तिकीट रद्द न करता असा करा प्रवास! )
आरक्षित तिकीट नसताना कसा कराल रेल्वे प्रवास?
- तुमच्याकडे आरक्षित तिकीट नसेल आणि केवळ प्लॅटफॉर्म तिकिट असेल तरीही तुम्ही रेल्वे प्रवास करू शकता. ट्रेनमध्ये तुम्ही तिकीट चेकरकडे जाऊन तिकीट तयार करून घेऊ शकता. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने हा नियम तयार केला असून प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला तात्काळ TC सोबत संपर्क साधणे आवश्यक आहे.
- प्रवासादरम्यान सीट उपलब्ध झाली नाही तरीही तुम्ही प्रवास करू शकता. रेल्वेच्या नियमांनुसार सीट उपलब्ध नसल्यास, TC तुम्हाला सीट देण्यास नकार देऊ शकतात परंतु प्रवास करण्यास रोखू शकत नाहीत. रिझर्व्हेशन नसल्यास तुम्हाला २५० रुपये दंड भरावा लागेल. यानंतर तुम्हाला TC प्रवासादरम्यान तिकीट तयार करून देईल.
- जर तुमची ट्रेन सुटली तर पुढील दोन स्थानकापर्यंत TC तुमची सीट कोणालाही अलॉट करू शकत नाही त्यामुळे ट्रेन जरी चुकली तरी पुढील दोन स्थानकापर्यंत तुम्हाला ट्रेन पकडण्याची संधी असते.