मागच्या अनेक दिवसांपासून इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. देशभरात महागाईने जोर धरला आहे. नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती 1000 पर्यंत पोहोचल्या आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे.
एका महिन्यात दुसरी वाढ
घरगुती सिलेंडरच्या दरांत केवळ 12 दिवसांत झालेली ही दुसरी वाढ आहे. यापुर्वी 7 मे 2022 ला ही घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. त्यावेळी एलपीजीच्या दरांमध्ये 50 रुपये प्रति सिलेंडर वाढ करण्यात आली होती. तसेच, त्याचबरोबर व्यवसायिक गॅस सिलिंडरची किंमतही 8 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
( हेही वाचा: आरक्षित तिकीट नसताना कसा कराल रेल्वे प्रवास? )
सर्वसामान्यांच्या खिशाला चटका
दिल्ली आणि मुंबईमध्ये 14.2 किलोंचा घरगुती एलपीजी सिलेंडर 1003 रुपयांना मिळणार आहे. गेल्या एका वर्षात दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरुन 1003 रुपयांवर गेला आहे. गुरुवारी, एलपीजीची किंमत कोलकातामध्ये 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1018.5 रुपयांवर पोहोचली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका लागणार आहे.
Join Our WhatsApp Community