शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. शेतक-यांच्या आंदोलनाची दिशा पुणतांबा गावात ठरवली जाते. येथे पक्षातील मतभेद बाजूला ठेऊन सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी एकत्र येतात. 23 मे रोजी याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 2017 सालच्या शेतकरी आंदोलनाची हाक याच पुणतंबा गावातून देण्यात आली होती.
बैठकीत निर्णय होणार
शेतक-यांसमोर आता एक ना अनेक प्रश्न उभा आहेत. उत्पादकतेपासून ते बाजारपेठेपर्यंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी आंदोलनाची दिशा ही जिल्ह्यातील पुणतांबा गावात ठरवण्यात आली आहे. 23 मे रोजी होणा-या या ग्रामसभेत राज्याला शेतकरी आंदोलनाची दिशा सभा होणार आहे. यंदा तर शेतक-यांचे प्रश्न वाढले असून, हमीभाव आणि खत, बी-बियाणांचा पुरवठा याबाबत अधिक प्रश्न उपस्थित केले जातील, असा अंदाज आहे. 23 मे रोजी विरोधक, सत्ताधा-यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे.
(हेही वाचा OBC Reservation: निवडणूक फाॅर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करु- अजित पवार )
Join Our WhatsApp Community