मनसेच्या संदीप देशपांडेंना मोठा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर

177

मुंबई सत्र न्यायालयाने मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मनसे आंदोलनाच्या दिवशी पोलिसांना चकवा देत हे दोघेही शिवाजी पार्क परिसरातून पळून गेले होते. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यामुळे संदीप देशपांडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

( हेही वाचा : OBC Reservation: निवडणूक फाॅर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करु- अजित पवार)

सशर्त जामीन मंजूर 

या दोघांनाही अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता यावर दोन वेळा सुनावणी करण्यात आली यानंतर काही अटी आणि शर्थींच्या आधारे न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. दर महिन्याच्या १ आणि २३ तारखेला त्यांना शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. मुंबई सोडायच्या आधी त्यांना तपास अधिकाऱ्यांना सर्व माहिती द्यावी लागेल. तक्रार संबंधित साक्षीदार, तक्रारदारांशी कोणताही संपर्क ठेवायचा नाही या अटींवरती हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्यावर या दरम्यान झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाल्या होत्या यानंतर या मनसे नेत्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती आता जामीन अर्ज मंजूर झाल्यामुळे देशपांडे आणि धुरींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.