जे.जे रुग्णालयाची कमाल! ‘या’ दुर्मिळ अवयव दानासाठी घेतला पुढाकार

141

कोरोना काळात सरकारी रुग्णालयात अवयव दानाची प्रक्रिया थंडावलेली असताना जे.जे रुग्णालयाने चक्क रुग्णाकडून मृत्यूपश्चात छोट्या आतड्याचे दान करत नवा आदर्श निर्माण केला. छोट्या आतड्यांची मुंबईतील ही पहिलीच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. कोलकता येथील रुग्णावर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ गौरव चौबल यांनी ही शस्त्रक्रिया केली

(हेही वाचा – Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशिदीची सुनावणी लांबणीवर, न्यायालयाकडे निर्णय राखीव)

मानवी शरीरात छोटे आतडे निकामी होण्याचे प्रमाण कमी आहे. आताड्याला गंभीर इजा किंवा आजार बळकावल्यास छोटे आतडे निकामी होत प्रत्यारोपणाची गरज भासते. परळ येथील ग्लोबल या खासगी रुग्णालयात छोट्या आताड्याच्या प्रत्यरोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला जे.जे रुग्णालयात ब्रेन स्ट्रोकने मृत्यू पावलेल्या महिलेकडून छोटे आतडे मिळाले. ही महिला मंगळवारी जे.जे रुग्णालयात दाखल झाली होती. उपचारादरम्यान ब्रेन डेड पावली. रुग्ण ब्रेन डेड अवस्थेत पोहोचल्यानंतर शरीरातील अवयव दान करता येतात. या महिलेच्या कुटुंबीयांना अवयव दानाची माहिती दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी दोन मूत्रपिंडे, हृदय आणि छोटे आतडे हे तीन अवयव दान केले गेले.

मुंबईतील 18 वे अवयव दान

बुधवारी भल्या पहाटे दोनच्या सुमारास ग्लोबल रुग्णालयात छोटे आतडे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया सुखरूप पार पडल्याची माहिती ग्लोबल रुग्णालयाने दिली. हे मुंबईतील 18 वे अवयव दान होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.