ज्ञानवापी मशिदीत हिंदू देवतांच्या मूर्ती

159

बनारसच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळल्याच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर माजी कोर्ट कमिश्नर अजय मिश्रा यांनी गुरुवारी वाराणसी न्यायालयात सर्व्हेचा अहवाल सादर केला. या अहवालात ज्ञानवापी परिसरात पश्चिमेकडे असेलल्या भिंतींवर प्राचीन मंदिरांचा मलबा सापडला असून, त्यात देवी- देवीतांच्या मूर्त्या सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

 सर्व्हेचा अहवाल सादर करण्याचे आदेश

कमिश्नर अजय मिश्रा यांनी वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार 6 आणि 7 मे रोजी ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे केला होता. मुस्लिम समुदायाने केलेल्या विरोधमुळे सर्व्हेचे काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर मुस्लिम पक्षाने न्यायालयाकडे निरीक्षक अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर विशाल सिंह आणि अजय सिंह यांना न्यायालय कमिश्नर म्हणून नियुक्त केले. तसेच, न्यायालयाने 17 मे रोजी ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

( हेही वाचा: मनसेच्या संदीप देशपांडेंना मोठा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर )

शिळांवर कमळाची चित्रे सापडली

अजय मिश्रा यांनी या सर्व्हेचा अहवाल कोर्टात सादर केला आहे. यावेळी ते एकटेच निरीक्षक म्हणून काम पाहत होते. यावेळी तिथे व्हिडिओग्राफीही करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी अहवाल तयार केला आहे. या अहवालात त्यांनी ज्ञानवापी परिसरात उत्तरेहून पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गावरील भिंतीवर शेषनाग व नागफणीसारख्या आकृती असल्याचा दावा या अहवालात केला आहे. तसेच 6 मे रोजी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये उत्तर ते पश्चिमेकडील भिंतीच्या कोनाड्यात प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. ज्यावर देवी- देवतांची कलाकृती तयार करण्यात आली आहे. तसंच, शिळांवर कमळाची चित्रेही सापडली आहेत, असे अहवालात नमूद आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.