मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा २२ मे रोजी होणार आहे. यापूर्वी राज ठाकरेंची सभा २१ मे रोजी मुठा नदी पात्रातील मैदानात होणार होती. मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे राज हे मुंबईला रवाना झाले, असे सांगण्यात आले. ही सभा रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र आता राज यांची सभा २२ मे रोजी पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
म्हणून सभा एक दिवस पुढे ढकलली
पुण्यातील राज ठाकरे यांच्या सभेबाबात संभ्रम निर्माण झाला होता. या सभेसंदर्भात राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्यासह बैठक घेतली. या बैठकीत बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, नदीपात्रात सभा होणार असल्याचे निश्चित केले होते. हवामान खात्याचा अंदाज पाहता पाऊस कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत अचानक पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल, यामुळे २१ ऐवजी २२ मे रोजी गणेश कला क्रिडा मंच या ठिकाणी सकाळी १० वाजता सभा हेण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे, असे सांगितले. यासह ते असेही म्हणाले की, राज ठाकरे यांना बऱ्याच विषयांवर बोलायचे आहे. त्यामुळे त्यांनी ही सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सभेसाठी मनसैनिकांची जय्यत तयारी सुरू
(हेही वाचा – मनसेच्या विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी जाहीर, सरचिटणीस पदी गजानन काळे, अखिल चित्रे)
दरम्यान, पुण्यात बंद सभागृहात ही सभा होणार असली तर मनसैनिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. बुधवारी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. तसेच मनसेच्या शहर कार्यकारणी बैठकीत पदाधिकाऱ्यांना या सूचना दिल्यात. सभेला जास्तीत जास्त नागरिकांना येण्याचे आवाहन करा, असेही सांगितले.
(हेही वाचा – राऊतांचा अग्रलेख वाचा… मग तुमच्यातील ‘सय्यद’ बंड करेल, आता मनसेचे ‘रोखठोक’)
Join Our WhatsApp Community