आता दादरमध्ये बिनधास्त घेऊन या गाड्या… पार्किंग समस्या सुटली

161

मुंबईत दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत चालली आहे. दादर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यातील काही लोक स्वत:चे वैयक्तिक वाहन घेऊन सुद्धा खरेदी करण्यासाठी येतात. अशावेळी वाहन पार्क कुठे करायचे याबाबत समस्या निर्णय होते परंतु दादरवासीयांची ही समस्या लवकरच सुटणार असून आता तुम्ही तुमच्या गाड्या अगदी शिवसेना भवन शेजारी असणाऱ्या कोहिनूर स्वेअरमध्ये पार्क, तसेच प्लाझा थिएटरमध्येही पार्क करू शकणार आहात.

( हेही वाचा : मनसेच्या संदीप देशपांडेंना मोठा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर)

यापूर्वी बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी जाताना गाड्या कुठे पार्क करायच्या याबाबत समस्या निर्माण व्हायची परंतु आता बाजारपेठेपासून अगदी जवळ तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता. मुंबई महापालिका आणि दादर व्यापारी संघाने एकत्र येत हा निर्णय घेतला आहे.

किती पैसे द्यावे लागणार?

ऐन बाजार पेठेत पालिका आणि व्यापारी संघाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या वॉलेट पार्किंगसाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत. सुरूवातीला तुम्हाला एक तासासाठी १०० रुपये मोजावे लागतील त्यानंतरच्या प्रत्येक तासासाठी तुम्हाला २५ रुपये मोजावे लागणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.