केतकीवर राज्यात १७ ठिकाणी गुन्हे, सर्व ठिकाणी पोलीस ताबा मागण्याची शक्यता

130

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे पोलीस कोठडीत असलेल्या केतकीला काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे सत्र न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी दाखल झाले होते. मात्र वेळे अभावी त्यांना ताबा घेता आला नाही. त्यामुळे ते आज केतकीचा ताबा घेत आहेत. त्यामुळे राज्यातील इतर ठिकाणचे पोलीसही केतकीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात आहे.

(हेही वाचा – केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?)

राज्याच तब्बल १७ ठिकाणी गुन्हे दाखल

पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात राज्याच तब्बल १७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यामुळे इतर पोलीस देखील केतकीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यासह इतरही ठिकाणचे पोलीस नंतर ताबा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. केतकीने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पोस्टविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त केला आहे.

स्वत:च न्यायालयात मांडली होती बाजू

रविवारी सुटीच्या न्यायालयात पोलिसांनी केतकीला हजर केले होते. यावेळी तिने आपली बाजू मांडण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्याऐवजी स्वत:च आपली बाजू न्यायालयासमोर मांडल्याचे दिसून आले. केतकीने न्यायालयात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिने केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, तिने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला. केतकीने सांगितले की, मी या पोस्ट डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे. शनिवारी रात्री ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कृष्णा कोकणी यांच्या पथकाने तिला अटक केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.