६ हत्तींचा विदर्भाला अलविदा, गुजरातसाठी रवाना

180

विदर्भातील १३ हत्तींना केंद्र सरकारच्या हट्टाने गुजरातमध्ये पाठवण्याच्या निर्णयाला आठवडा उलटण्याअगोदरच ताडोबातील ६ हत्तींची गुरुवारी सकाळीच रवानगी केली गेली. याबाबत कोणालाही काहीच पूर्वकल्पना न देता ६ हत्तींनी आपले ताडोबातील घर सोडले. दोन दिवस रात्रीचा प्रवास करत नागपूर-अहमदाबादमार्गे ६ हत्ती जामनगर येथील राधे क्रिष्णा मंदीर एलिफंट ट्रस्टमध्ये कायमचे पिंज-यात बंदिस्त होतील.

( हेही वाचा : पुण्यातील चासकमान धरणात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू)

गुजरातसाठी रवाना

६ हत्तींना घेण्यासाठी राधे क्रिष्णा मंदिर एलिफंट ट्रस्टच्या पशुवैदयकीय, माहुत आणि इतर अधिका-यांची टीम बुधवारी दुपारी ताडोबात पोहोचली. ताडोबातील हत्ती कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेब्ररी हत्ती कॅम्पमधून गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास ६ हत्तींना ताडोबातील वनाधिका-यांनी जड अंतःकरणाने अलविदा केले. सहा ट्रकच्या माध्यमातून दोन रात्रींचा प्रवास करत ६ हत्ती जामनगरला पोहोचतील. ६ हत्तींना कोणाच्याही नकळत ताडोबाच्या बाहेर काढले गेले. यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाद्वारे कर्नाटक राज्यातून प्रशिक्षित हत्ती आणून हत्ती पथक ताडोबात तयार केले जाईल, अशी माहिती ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तसेच क्षेत्रसंचालक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.