मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या बीकेसीतील पालिकेच्या कोविड केंद्रातील कित्येक कोरोना योद्ध्यांची कहाणी ही डोळ्यांत पाणी आणणारी होती. आपल्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी केंद्रातील कित्येक कोरोना योद्धे दीड वर्ष केवळ आठवड्यातून एकदा घरी जात होते.
( हेही वाचा : ६ हत्तींचा विदर्भाला अलविदा, गुजरातसाठी रवाना )
कोरोना योद्धांची भूमिका लाखमोलाची
कोविड केंद्राला दोन वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आज बीकेसी कोविड केंद्रात पार पाडलेल्या कार्यक्रमात कित्येक कोरोना योद्धांच्या आठवणींना उजाळा मिळाला. मुंबई बाहेरचे अनेक कोरोना योद्धे घरी जाऊ शकले नाहीत, त्यांना नजीकच्या सोफिटेल हॉटेलमध्ये ठेवले गेले. रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी, प्रयोगशाळा तसेच कोरोनावर यशस्वी उपचार झाल्यानंतरही या कोरोना योद्धांच्याच पुढाकाराने भारतातील पोस्ट कोविड बाह्यरुग्ण सेवाही बीकेसी कोविड केंद्रात उपलब्ध केली गेली. नैसर्गिक आव्हानांपासून ते यंत्रसामग्रीच्या पाठपुराव्यांमध्ये कोरोना योद्धांची भूमिका लाखमोलाची ठरली, या शब्दांत बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी टीमला धन्यवाद दिले.
Join Our WhatsApp Community