पोलिसांच्या हाताला झटका देत; जळगाव कारागृहातून कैदी फरार

154

पोलिसांच्या हाताला झटका देऊन जिल्हा कारागृहाच्या आवारातून एक कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्हा कारागृहात नेत असताना, पोलिसांच्या हाताला झटका देऊन वाशीम जिल्ह्यातील कैदी फरार झाला आहे. या प्रकरणी फरार कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत असलेला कैदी महेश शिवदास दीक्षे वय-30 राहणार लोणी बुद्रुक, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम याला अटक करण्यात आली होती. पुढील कारवाईसाठी कैद्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, भुसावळ येथून जळगाव येथील जिल्हा कारागृहात ट्रान्सफर होण्यासाठी भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक व पो.काॅ. ईश्वर संजय भालेराव शासकीय वाहनाने जिल्हा कारागृहात आणण्यात आले होते.

( हेही वाचा: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित! जाणून घ्या ‘राज’ की बात…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.