राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सातत्याने आरोप करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने टीका करण्यात येते. पण आता पडळकरांनी चूक दाखवून दिल्यानंतर पवारांनी ती सुधारल्याचे दिसत आहे. मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवारांनी केलेल्या ट्वीटमध्ये यशवंतराव यांचा फोटो शेअर केला. त्यानंतर पडळकरांनी त्यांच्यावर टीका करत त्यांची चूक दाखवून दिल्यानंतर, पवारांनी ते ट्वीट काही वेळातच डिलीट केले.
काय झाले नेमके?
शरद पवार यांनी शुक्रवारी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ट्वीट केले. पण त्या ट्वीटमध्ये मल्हारराव होळकरांऐवजी यशवंतराव होळकर यांचा फोटो शेअर करण्यात आला. त्यावरुन पडळकर यांनी ट्वीट करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ज्यांना सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्यातला फरक कळत नाही, त्यांना आमच्या समाजाच्या समस्या काय कळणार?, असे म्हणत पडळकरांनी पवारांकडून झालेली चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर काही वेळात पवारांनी हे ट्वीट डिलीट करुन, नवीन ट्वीटमध्ये मल्हारराव होळकर यांचा फोटो लावून आपली चूक सुधारली.
स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आणि ते वाढविण्यासाठी मल्हारराव होळकर यांनी आपले आयुष्य समर्पित केले. मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. इंदौर संस्थानाचे संस्थापक, शूरवीर सेनानी राजे मल्हाराव होळकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/IPtxtD1RMy
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 20, 2022
(हेही वाचाः राज ठाकरेंवर लिलावतीत शस्त्रक्रिया होण्याची शक्यता)
पडळकरांचे ट्वीट
मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार यांनी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटवरुन आता पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. ‘ज्यांना सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्यातला फरक कळत नाही, त्यांना आमच्या समाजाच्या समस्या काय कळणार? अशा लबाडाघरचं आवतन आम्हाला माहितीये.तुम्ही कितीही थापा मारल्या तरी आम्ही तुमच्याकडून आमच्या राजाचा वाफगाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. जय मल्हार.’,
असे ट्वीट करत पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे.
ज्यांना सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्यातला फरक कळत नाही, त्यांना आमच्या समाजाच्या समस्या काय कळणार? अशा लबाडाघरचं आवतन आम्हाला माहितीये.तुम्ही कितीही थापा मारल्या तरी आम्ही तुमच्याकडून आमच्या राजाचा वाफगाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. जय मल्हार. pic.twitter.com/b1bbrFaPai
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) May 20, 2022
(हेही वाचाः राज्यसभा निवडणुकीत भाजप धक्का देणार!)
Join Our WhatsApp Community