शुक्रवारी, २० मे रोजी वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत १२०० हून अधिक मुस्लिम नमाज अदा करण्यासाठी पोहोचले. त्यामुळे प्रथमच ज्ञानवापी हाऊसफुल्ल झाले. तसेच बाहेरही मोठा जमाव जमला होता. यानंतर मात्र मशिदीचा मुख्य दरवाजा तात्काळ बंद केला. लाऊडस्पीकरवर लोकांना इतर मशिदींमध्ये नमाज अदा करण्याचे आवाहन करण्यात आले. दुसरीकडे शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर वाराणसीमध्ये सकाळपासूनच हाय अलर्ट जारी करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून ज्ञानवापीबाहेर मोठ्या प्रमाणात कमांडो आणि फौजफाटा तैनात करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु
ज्ञानवापी प्रकरणी सर्वेक्षण करणाऱ्या पथकाने गुरुवारी, १९ मे रोजी वाराणसी न्यायालयात अहवाल सादर केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला आणखी एक दिवस सुनावणी न घेण्यास सांगितले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरु झाली आहे. अशावेळी ज्ञानव्यापी येथे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. भारतात इस्लामिक राजवटीच्या हजारो वर्षांपूर्वी ही संपत्ती आदि विश्वेश्वराची होती. देवाची मालमत्ता कोणालाही देता येत नाही. औरंगजेबाने शासक असल्याने जबरदस्तीने ताब्यात घेतले होते. यामुळे मुस्लिमांना मालमत्तेवर हक्क मिळत नाही, असे हिंदू याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वप्रथम सर्व पक्षकारांच्या वकिलांची माहिती घेतली. यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आदेश 7 च्या नियम 11 बद्दल सांगितले की अशा प्रकरणांमध्ये फक्त जिल्हा न्यायाधीशांनी ऐकले पाहिजे.
Join Our WhatsApp Community