ज्ञानव्यापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने तीन पर्याय दिले आहेत, त्यामध्ये या प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने सुनावणी करावी, वाराणसी न्यायालय अंतरिम आदेश देऊ शकते आणि निर्णय लागू होईपर्यंत अंतरिम आदेश लागू असेल असे न्यायालयाने म्हटले आहे, तसेच शिवलिंगाची सुरक्षा करा आणि तेथील नंदीच्या समोरची भींत पाडू नका, अशी सूचनाही न्यायालयाने केली.
आम्ही वाराणसी न्यायालयाला काही आदेश देणार नाही, मुस्लिम समुदायाची याचिकाही ऐकण्याच्या योग्यतेची आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांच्या अधिकारात सुनावणी करावी, तसेच मुस्लिमांना नमाज पठण करण्यासाठी परवानगी द्या, असे न्यायालयाने म्हटले आहे. ज्ञानवापी येथील सर्वेक्षणाचा अहवाल माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे मुस्लिम याचिकाकर्ते यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करत सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध करू नका, असेही न्यायालयाने म्हटले.
प्रथमच शुक्रवारी नमाजासाठी झाली फुल्ल, पोलिसांचा कडक बंदोबस्त
शुक्रवारी, २० मे रोजी वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत १२०० हून अधिक मुस्लिम नमाज अदा करण्यासाठी पोहोचले. त्यामुळे प्रथमच ज्ञानवापी हाऊसफुल्ल झाले. तसेच बाहेरही मोठा जमाव जमला होता. यानंतर मात्र मशिदीचा मुख्य दरवाजा तात्काळ बंद केला. लाऊडस्पीकरवर लोकांना इतर मशिदींमध्ये नमाज अदा करण्याचे आवाहन करण्यात आले. दुसरीकडे शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर वाराणसीमध्ये सकाळपासूनच हाय अलर्ट जारी करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून ज्ञानवापीबाहेर मोठ्या प्रमाणात कमांडो आणि फौजफाटा तैनात करण्यात आला.
Join Our WhatsApp Community