काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूच्या अडचणीत वाढ होत आहे. अनेक वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्याला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. सिद्धूने शुक्रवारी पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर सुरु असलेल्या रोड रेज प्रकरणी 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण 34 वर्ष जुने आहे. नवज्योत आणि त्याच्या मित्राची पटियाला येथील कार पार्किंगवरुन वाद झाला. या वादात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धूला एका वर्षाची कारावासाची शिक्षा देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने ठरवले दोषी
संबंधित प्रकरणात सत्र न्यायालयाने पुरावे नसल्याने, 1999 साली निर्दोष ठरवले. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने 2006 साली सिद्धूला 3 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड केला. या विरोधात सिद्धूने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 16 मे 2018 रोजी हत्येचा हेतू नसल्याचे, सांगून सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला आरोपातून मुक्त केले. पण, आयपीसी कलम 323 नुसार न्यायालयाने त्याला दोषी ठरवले.
( हेही वाचा: ज्ञानव्यापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुचवले ‘हे’ तीन पर्याय )
1988 चे जुने प्रकरण
सिद्धू यांच्यावर 1988 सालचे रोडरेज प्रकरण आहे. सिद्धूचे पटियाला येथे कार पार्किंगवरुन 65 वर्षीय गुरनाम सिंह या व्यक्तीशी भांडण झाले होते. सिद्धू वर असा आरोप आहे की, या वादात त्याने मारहाण देखील केली होती. त्यानंतर गुरुनाम यांचे निधन झाले. पंजाब पोलिसांनी सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर सिंह सिद्धू यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता.