एसी लोकल सोबतच लोकलमधील फर्स्ट क्लासच्या तिकीट दरांतही कपात करण्यात आल्यामुळे आता पश्चिम रेल्वेवरील फर्स्ट क्लासच्या तिकीट विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्या मानाने मध्य रेल्वेवर फर्स्ट क्लासने प्रवास करणा-या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत नाही.
पश्चिम रेल्वेवर वाढले प्रवासी
एसी लोकल पाठोपाठच सामान्य लोकलमधील फर्स्ट क्लासचे तिकीट दरही कमी करण्यात आले आहेत. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. पण पश्चिम रेल्वेवर सामान्य लोकलमधील फर्स्ट क्लासमधून प्रवास करणा-या प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पण त्या तुलनेत मध्य रेल्वेवर फर्स्ट क्लासमधून प्रवास करणा-या प्रवाशांच्या संख्येत तितकी वाढ झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः एसी लोकल वाढल्याचा सामान्य लोकलना फटका, सर्वसामांन्यांचा 40 मिनिटे होतो खोळंबा)
इतकी वाढली संख्या
एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनमध्ये दररोज 4 हजार 577 लोकल ट्रेनची विक्री होत होती, त्यानंतर 1 ते 4 मे पर्यंत दररोज सरासरी 4 हजार 953 तिकीटांची विक्री झाली. पण तिकीटांचे दर कमी होताच 5 मे पासून 18 मे पर्यंत दररोज सरासरी 6 हजार 895 तिकीटांची विक्री झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. यामानाने मध्य रेल्वेवर 8 मे रोजी 3 हजार 580 आणि 15 मे रोजी सर्वाधिक 3 हजार 828 तिकीटांची विक्री झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
(हेही वाचाः सोसायटींमधील वादांच्या तक्रारींसाठी आता स्वतंत्र पोलिस अधिकारी, पोलिस आयुक्तांची घोषणा)
Join Our WhatsApp Community