मध्य रेल्वेवर २१ आणि २२ मे रोजी रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : पुणे- मुंबई महामार्ग दुपट्टीने मोठा होऊन ४२ मीटर रुंदीचा होणार )
मध्य रेल्वेवर रात्रीचा मेगाब्लॉक
- दिनांक २१ मे रात्री ११.३० ते २२ मे पहाटे ५.४० वाजेपर्यंत भायखळा ते माटुंगा जलद मार्गावर मेगाब्लॉक
- सकाळी ५.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद गाड्या भायखळा आणि माटुंगा स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
- २१ मे रोजी रात्री १०.५८ ते रात्री ११.१५ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा आणि भायखळा स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक
- पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द.
- पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
- ब्लॉक कालावधीत खारकोपर आणि बेलापूर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार धावतील.
- ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी भागात विशेष उपनगरीय गाड्या सोडण्यात येतील.
हे मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community