मुंबई विद्यापीठातील बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. राज्यातील अनेक नेते आणि दिग्गज मंडळी हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. या प्रदर्शनाला शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटो पाहून आपण निःशब्द झाल्याचे म्हटले आहे. एक ट्वीट शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हा फोटो बोलका…
या प्रदर्शनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक मान्यवरांसोबतचे फोटो आहेत. त्यामध्ये बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेतील उद्धव ठाकरे यांचा एक भावूक फोटो देखील आहे. हा फोटो पाहून आपण निःशब्द झाल्याच्या भावना पवारांनी ट्वीटद्वारे व्यक्त केल्या आहेत. हा फोटो खूप बोलका आहे, तो पाहून मी तर निःशब्दच झालो आहे, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
(हेही वाचाः भाजपच्या पडळकरांनी चूक दाखवताच पवारांनी डिलीट केले ‘ते’ ट्वीट)
मुंबई विद्यापीठाच्या 'बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा'त भरवलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनातील हा फोटो खूप बोलका आहे… तो पाहून मी तर निःशब्दच झालो. pic.twitter.com/TE7UygjpQJ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 19, 2022
मविआ पहायला बाळासाहेब हवे होते- आदित्य ठाकरे
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे मंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांनी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीच्या आठवणी सांगितल्या. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री फार जुनी असून, आज महाविकास आघाडीतील या तिन्ही पक्षांची मैत्री पहायला बाळासाहेब हवे होते, असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले होते.
(हेही वाचाः आदित्य ठाकरे म्हणतात, आता बाळासाहेब हवे होते)
Join Our WhatsApp Community