आयपीएल 2022 च्या मोसमातील चेन्नई सुपर किंग्स आपला शेवटचा सामना शुक्रवारी खेळत आहे. मुंबईत राजस्थान रॉयल्सविरुद्ध हा सामना होणार आहे. या सामन्याच्या वेळी महेंद्रसिंग धोनीने मोठी घोषणा केली आहे. आपण आयपीएलमधला आपला शेवटचा सामना चेन्नईच्या मैदानात खेळणार असल्याचे धोनीने जाहीर केले आहे. त्यामुळे आता धोनीच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
आयपीएलच्या या मोसमातील चेन्नईची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याने चेन्नईचा संघ आयपीएलच्या स्पर्धेतून बाद झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये शेवटचा सामना शुक्रवारी होत आहे. या सामन्याच्या आधी झालेल्या टॉसच्या वेळी धोनीने मोठी घोषणा केली आहे.
(हेही वाचाः वॉर्न आणि सायमंड्सच्या मृत्यूमागचा ‘हा’ आहे दुर्दैवी योगायोग)
धोनीने केली घोषणा
मी जर आयपीएलचा सामना चेन्नईत खेळलो नाही, तर ते चाहत्यांसाठी योग्य ठरणार नाही. चेन्नईच्या चाहत्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरच मी आयपीएलचा शेवटचा सामना खेळणार आहे. हा अखेरचा सामना खेळताना मला त्यांचे धन्यवाद मानायचे आहेत. त्यामुळे आयपीएलचा माझा शेवटचा सामना हा चेन्नईत होईल, असे विधान महेंद्रसिंग धोनी याने केलं आहे.
या मोसमात चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा ही रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आली होती. पण काही सामन्यानंतर जडेजाने चेन्नईचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर धोनीकडे पुन्हा एकदा चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा आली होती.
(हेही वाचाः एसी लोकल वाढल्याचा सामान्य लोकलना फटका, सर्वसामांन्यांचा 40 मिनिटे होतो खोळंबा)
Join Our WhatsApp Community