राष्ट्रवादीचे नेते यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात मोठा झटका बसला आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिकांविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. नवाब मलिक यांचे डी गॅंगशी संबंध होते असे न्यायालयाने म्हटले आहे. गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी नवाब मलिकांना कट रचल्याचा आरोप ईडीने केला होता.
( हेही वाचा : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २४ ते २७ मे पर्यंत ‘या’ भागात पाणी कपात )
नवाब मलिकांचे ‘डी’ गॅंगसोबत संबंध होते! न्यायालयाचे निरीक्षण
21 एप्रिल रोजी ईडीने मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड ताब्यात घेण्यासाठी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर आणि त्याचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्यासोबत मंत्री नवाब मलिक यांच्या वारंवार बैठका झाल्या, मनी लॉंड्रिंग प्रकरणात त्यांचा सहभाग आहे असे प्राथमिक निरीक्षण रोकडे यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे. मलिकांते डी गॅंगशी संबध असल्याचे निरीक्षण नोंदवले गेल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community