मुंबईत नागरिकांना १ जूनपासून योगाचे धडे दिले जाणार आहेत. मुंबईतील धकाधकीच्या जीवनात अलिकडे आजारांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, नैराश्य यांसारख्या आजारांचा समावेश आहे. त्यामुळे औषधापचारांसोबत आरोग्यदायी जीवनशैली व योगासनांचा प्रचार झाल्यास याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. यामुळेच मुंबई महानगरपालिकेने सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये येत्या १ जूनपासून शिव योग केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २४ ते २७ मे पर्यंत ‘या’ भागात पाणी कपात )
शिव योग केंद्रात सहभागी होण्यासाठी किमान ३० नागरिकांच्या गटाने आपल्या विभाग कार्यालयाकडे अर्ज करणे अपेक्षित आहे अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे योगाचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकाला दोन तासांचे १ हजार रुपये मानधन सुद्धा महापालिकेकडून देण्यात येणार आहे.
शिव योग केंद्र
- या योगा केंद्रासाठी २५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून मुंबईत एकूण २०० शिव योगा केंद्र सुरू केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यातील १०० केंद्र सुरू होतील. तसेच यासाठी प्रशिक्षकांचे एक पॅनेलही तयार करण्यात येणार आहे.
- शिवयोगा केंद्रासाठी खुली जागा, सभागृह, समाज मंदीर हॉल असेल त्यांनी प्राधान्य देण्यात येणार आहे.
- ही जागा मोफत उपलब्ध होण्याकरता समन्वय करणे अथवा उद्यानातील मोकळी जागा, मैदान, शाळेचा हॉल, समाज कल्याण केंद्र असे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येईल.
- किमान ३० नागरिकांच्या गटासाठी एक शिव योग केंद्र सुरू करण्यात येईल.
- एका गटाचा प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिन्यांचा असेल व प्रशिक्षणाचा कालावधी प्रतिदिन १ तासाचा असेल,
- योग वर्ग सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत कार्यरत राहील.