बिहारमध्ये वीज पडून ३३ जणांचा मृत्यू!

156

संपूर्ण देशावर उष्णतेची लाट पसरलेली असतानाच उत्तरेकडील राज्यांना गेल्या चोवीस तासात वादळी पावसाचा सामना करावा लागला आहे. बिहारमधील १६ जिल्ह्यांमधील ३३ लोकांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. बिहार सरकारने मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

( हेही वाचा : कोकणरेल्वे फुल्लं! चाकरमान्यांना धरली परतीची वाट; उन्हाळी विशेष गाड्यांना दिली मुदतवाढ )

३३ लोकांचा वीज पडल्यामुळे मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. दरम्यान या मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहारच्या भगलपूर या भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. केवळ भगलपूरमध्ये सात लोकांचा वीज पडून मृत्यू झाला आहे, तर मुजफ्फरमध्ये ६ जण दगावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातलगांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत केली जाईल अशी घोषणा केली. तसेच ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे त्यांना देखील तात्काळ नुकसान भरपाई दिली जावी असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.