मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तेल गळती, तेल गोळा करायला स्थानिकांची झुंबड

144

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी खाद्यतेल वाहून नेणा-या टँकरचा अपघात झाला. पालघर जवळील सोमटा येथे हा टँकर उलटल्यानंतर त्यातून तेल गळती सुरू झाली. त्यानंतर तेल गोळा करण्यासाठी स्थानिक रहिवाशांची एकच झुंबड उडाली आहे. दरम्यान या अपघाताचे कारण अजून समोर आलेले नसून, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.

तेल गोळा करायला गर्दी

खाद्यतेल वाहून नेणारा हा टँकर गोव्याहून मुंबईकडे जात होता. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा टँकर उलटल्यानंतर त्यामधून तेल गळती व्हायला सुरुवात झाली. हे तेल रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्ड्यात गोळा होत आहे. हे तेल गोळा करण्यासाठी येथील गावक-यांनी हंडा, कॅन तसेच घरातील भांडीकुंडी घेऊन प्रचंड गर्दी केली आहे.

(हेही वाचाः लाल महालात लावणी, अ.भा. मराठा महासंघाने केला निषेध)

अपघाताच्या अनेक घटना

दोन दिवसांपूर्वी याच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर द्रव्य रुपाचील टँकरचा अपघात झाला होता. या राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी ते चिल्हार फाटा या पट्ट्यादरम्यान अनेक धोकादायक वळणे आहेत. त्यामुळे येथे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. महामार्गांवर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहनांतील ऐवज गोळा करण्यासाठी स्थानिक रहिवाशांकडून अशाप्रकारची झुंबड उडाल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत.

(हेही वाचाः App शिवाय ओळखता येणार Unknown नंबर, केंद्र सरकार आणणार नवीन तंत्रज्ञान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.