उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संबंध?, सोमय्यांच्या विधानाने खळबळ

144

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचे निरीक्षण न्यायालयाने वर्तवले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावरुन आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध आहेत का याचा खुलासा त्यांनी करावा असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा

नवाब मलिक हे दाऊद गँगचे सदस्य आहेत हे आता सिद्ध झालं आहे. पण जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा नवाब मलिक यांना आपल्या मंत्रिमंडळात कायम ठेवणा-या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध आहेत का, याची महाराष्ट्राला काळजी वाटत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर याबाबतचा खुलासा करावा, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः नवाब मलिकांचे ‘डी’ गॅंगसोबत संबंध होते! न्यायालयाचे निरीक्षण)

हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात

ज्या गोवावाला कंपाऊंडमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मलिक यांना दोशी ठरवण्यात येत आहे, ते कंपाऊंड मातश्रीपासून चार किमी. अंतरावर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना वाचवणारे उद्धव ठाकरे यांना आता उत्तर द्यावे लागणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून दहशतवाद्यांवर चांगलाच निशाणा साधल्याचे मी पाहिले आहे. पण त्यांच्या मुलाने आता सगळेच गहाण ठेवले आहे. हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात, असा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचे एका पेक्षा एक टीझर फक्त एका क्लिकवर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.