जुलै २०२० मध्ये बॉलिवूड स्टार विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनू मेनन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं व शकुंतला देवीची भूमिका विद्या बालनने निभावली होती. शकुंतला देवी एक अद्भूत व्यक्ती होती. त्यांना ह्यूमन कंप्युटर म्हटलं जायचं.
( हेही वाचा : बॅडमिंटनची सुरुवात ब्रिटिशांनी महाराष्ट्रातल्या ‘या’ शहरात केली होती; आज आपण आहोत चॅम्पियन )
लहानपणीच गणिताशी मैत्री झाली
शकुंतला देवीचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी बंगळुरु येथे एका परंपरावादी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आजोबांची इच्छा होती की त्यांच्या वडिलांनी पौरोहित्य करावं. पण त्यांच्या वडिलांना पौरोहित्य करण्यात रस नव्हता. त्यांना सुरुवातीपासूनच सर्कसमध्ये काम कराय़चं होतं. मग त्यांनी परंपरेच्या बेड्या मोडून सर्कसमध्ये काम करायला सुरुवात केली.
शकुंतला देवी यांना लहानपणापासूनच खूप संघर्ष करावा लागलेला आहे. शाळेची फी भरता आली नाही म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे त्यांचं प्राथमिक शिक्षण देखील होऊ शकलं नाही. तरी सुद्धा त्यांना मानव संगणक म्हटलं जात हे विशेष. लहानपणी वडिलांसोबत पत्ते खेळतानाच त्यांचा गणिताशी जवळचा संबंध आला. त्यांची स्मरणशक्ती लाजवाब होती. ३ वर्षांची असतानाच त्यांनी आपल्या गणिती कौशल्याने लोकांना अवाक केलं.
त्यांचं हे कौशल्य त्यांच्या वडिलांनी हेरलं आणि सर्कशीत काम करणं सोडून त्यांनी आपल्या मुलीला घेऊन रस्त्यावर सार्वजनिक शो करु लागले. त्यांचे वडिलही सर्कशीत पत्त्यांचा खेळ करवून दाखवायचे. आता त्यांच्या सोबतीला होती शकुंतला देवी. ६ वर्षाची असताना त्यांनी ही करामत मैसूर विश्वविद्यालयाच्या प्रोफेसरसमोर करुन दाखवली आणि आपल्या मुलीच्या करामतीमुळे तिच्या वडिलांना १९४४ मध्ये लंडनला जाण्याची संधी मिळाली.
खासियत शकुंतला देवीची
त्यांनी पत्त्यांच्या खेळात लहानपणीच आपल्या वडिलांना हरवलं होतं, तेव्हाच त्यांच्या वडिलांना त्यांच्यातले हे गुण दिसले. गणितातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्या सहज सांगायच्या. महत्वाचं म्हणजे त्या काळी कंप्युटर आले नव्हते आणि जगातल्या कोणत्याही कॅल्युलेटरवर मोठ्या संख्येचं गणित केलं जात नव्हतं. त्या काळी शकुंतला देवी मोठ्या संख्येचे गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी सहज करायच्या आणि लोक तोंडात बोटे घालायचे. त्यांना ह्युमन कंप्युटर आणि वंडर गर्ल म्हटलं गेलं. जगभरात त्यांनी किर्ती पसरली.
१९८८ रोजी कॅलिफोर्नियाच्या विश्वविद्यालय-बर्कले मध्ये मनोवैज्ञानिक ऑर्थर जेन्सेन यांनी यांनी एक टेस्ट तयार केली होती. हे कोडं शकुंतला देवीने ५ सेकंदात सोडवलं. त्यांनी ४० सेकंदात ४० अंकी गणित सोडवले आहेत. म्हणजे ४६,२९५ ला तुम्ही जर ७ ने गुणाकार केला तर २७ हे उत्तर येतं. शकुंतला देवीने हे कोडं सहज सोडवलं होतं हे पाहून तिथले लोक आश्चर्यचकीत झाले होते.
विदेश दौरे
शकुंतला देवीने १९५० रोजी युरोपचा दौरा केला. या दौर्यावर आपल्या अंकगणिताच्या कौशल्याने सर्वांनाच चकीत केलं. १९७६ रोजी यूयॉर्कमध्येहू त्यांनी आपली प्रतीभा दाखवली. १९८८ रोजी युएस दौर्यावर असताना प्रोफेसर जेनसन प्रभावित झाले होते. या दौर्यावर मोठ्या संख्येच्या गणितांनी त्यांनी सर्वांनाच अवाक केलं होतं. १९७७ मध्ये दक्षिणी मेथोडिस्ट विश्वविद्यालयात त्यांची परीक्षा घेण्यात आली, महत्वाचं म्हणजे इथे त्यांनी ५० सेकंदात प्रश्नांची उत्तरे दिली.
राजकारणात प्रवेश
त्यांनी राजकीय कारकीर्द आजमावून पाहिली. १९८० रोजी त्यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली परंतु राजकारणात त्यांना गती मिळाली नाही. म्हणून पुन्हा त्या राजकारणाच्या वाटेला गेल्या नाहीत.
वैयक्तिक आयुष्य
१९६० मध्ये भारतात परतल्यावर कोलकोतातीला भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी परितोष बॅनर्जी यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. परंतु १९७९ मध्ये त्याचा डिवोर्स झाला. त्यांचे पती समलैंगिक होते म्हणून हा विवाह टिकू शकला नाही असं म्हटलं जातं.
त्यांच्या मुलीचं नाव अनुपमा बॅनर्जी होतं. आपल्या शेवटच्या काळात शकुंतला देवी आपल्या मुलीसोबत राहत होत्या. आई आणि मुलीचं नातं खूप चांगलं होतं असं म्हणतात.
एप्रिल २०१३ रोजी त्यांची तब्येत खूपच नाजूक होती. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून बॅंगलोरच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांचे ह्रदय व किडणी सुद्धा कमजोर झाली होती. दोन आठवडे त्यांनी मृत्यूशी झुंज दिला आणि २१ एप्रिल २०१३ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.
Join Our WhatsApp Community