बेस्टच्या पीएफ निधीमध्ये १९० कोटींचा घोटाळा

166

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये १९० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून बेस्ट अधिकाऱ्यांनी यावर डल्ला मारला आहे असा आरोप भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्राद्वारे थेट तक्रार केंद्रीय कामगार आणि श्रममंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.

६ हजार ५०० कामगारांचे १९० कोटी गेले कुठे?

मुंबई महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी खासगी कंत्राटदाराशी हातमिळवणी करून या कचरा कामगार आणि सफाई कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची उधळपट्टी करत आहेत आणि अशाप्रकारे या कामगारांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळ सुरू आहे असे योगेश सागर यांनी पत्रात लिहिले आहे. २००९ पासून महापालिकेने ६ हजार ५०० कंत्राटी कामगारांची भरती केली आहे. या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात आलेला नाही आणि त्यांनी पीएफ क्रमांकही देण्यात आलेला नाही. सन २००९ पासून आतापर्यंत ३ लाख ८० हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केले पाहिजे होते. ६ हजार ५०० कामगारांचे १९० कोटी गेले कुठे हा प्रश्न अनुत्तरीतच आहे असा प्रश्न योगेश सागर यांनी आपल्या पत्राद्वारे उपस्थित केला आहे.

कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलने करूनही त्यांचा आवाज महाविकास आघाडी व सरकारपर्यंत पोहचत नाही. पालिकेचे आयुक्तही याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनातील अधिकारी व खासगी कंत्राटदार यांच्या संगनमताने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी लुटला जातोय असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.