बँक खातेधारकांची अशी होत आहे फसवणूक, सरकारने दिला सावधानतेचा इशारा

165

बँकेच्या व्यवहारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे खातेधारकांची फसवणूक झाल्याच्या घटना आजवर अनेकदा घडत असतात. त्यामुळे सातत्याने याबाबत सरकारकडून सावधानतेचा इशारा देण्यात येतो. असाच एक इशारा आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांना देण्यात आला आहे. सरकारी एजन्सी असलेल्या पीआयबीने एक ट्वीट करत याबाबत खातेधारकांना सावध केले आहे.

लिंकवर क्लिक करू नका

SBIच्या बँक खातेधारकांना खासगी किंवा बँक खात्यासंबंधीची माहिती शेअर करण्यास सांगणारा एक मेसेज जात आहे. तुमच्या SBI खात्याचे डॉक्यूमेंट एक्सपायर झाले आहे. पुढे दिलेल्या लिंकवर लवकरात लवकर तुमची माहिती शेअर करा. अन्यथा तुमचे अकाऊंट ब्लॉक होऊ शकते. असा मेसेज खातेधारकांना पाठवण्यात येत आहे. त्यामुळे अशा लिंकवर क्लिक करुन फसवणुकीला बळी पडू नका, असे पीआयबीकडून सांगण्यात आले आहे.

इथे करा तक्रार

तसेच असा मेसेज आल्यास त्याची तक्रार [email protected] या लिंकवर करावी, असेही पीआयबीकडून सांगण्यात आले आहे. याआधीही SBI खातेधारकांची KYCच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे बँकेकडूनही अशा बाबतीत खातेधारकांना सातत्याने सावध करण्यात येत आहे. बँकेच्या नावाखाली आलेल्या कुठल्याही मेसेजच्या लिंकवर क्लिक करू नये, अन्यथा तुमचे बँक अकाऊंट रिकेमे केले जाऊ शकते, असा इशारा बँकेकडून देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.