पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामांन्यांच्या खिशाला चांगलीच झळ पोहोचत आहे. पण आता याचबाबतीत केंद्र सरकारने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मोठी घट होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
(हेही वाचाः App शिवाय ओळखता येणार Unknown नंबर, केंद्र सरकार आणणार नवीन तंत्रज्ञान)
केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात
पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात(Excise duty)प्रतिलिटर 8 रुपयांची, तर डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 6 रुपयांची कपात करण्यात येणार आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घट होणार आहे. पेट्रोल प्रतिलिटर 9.5 रुपयांनी तर डिझेल पेट्रोल 7 रुपयांनी स्वस्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामांन्यांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे.
We are reducing the Central excise duty on Petrol by Rs 8 per litre and on Diesel by Rs 6 per litre. This will reduce the price of petrol by Rs 9.5 per litre and of Diesel by Rs 7 per litre: Union Finance Minister Nirmala Sitharaman
(File Pic) pic.twitter.com/13YJTpDGIf
— ANI (@ANI) May 21, 2022
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचे एका पेक्षा एक ‘टीझर’, फक्त एका क्लिकवर)
अशा असतील नवीन किंमती
गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने गगनाला भीडत असल्याचे दिसत आहे. सध्या मुंबईसारख्या काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर 120 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता पेट्रोलचे हेच दर 110 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. तर मुंबईत डिझेलची किंमत 104 रुपये आहे. ती किंमत 97 रुपयांपर्यंत कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community