सध्या राज्यसभेतील महाराष्ट्राच्या वाट्यातील सहा जागांवर सध्या लॉबिंग सुरू आहे. यात छत्रपती संभाजी हे अपक्ष लढवणार आहेत. अशा वेळी त्यांना भाजप किंवा महाविकास आघाडीतील पक्ष मदत करणार का, अशी चर्चा सुरू झालेली आहे. तसेच दुसरीकडे शिवसेना सहावी जागा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा वाढलेली असताना आता विधान परिषदेच्या निवडणुकीचाही विषय वाढू लागला आहे. त्यासाठीही लॉबिंग सुरू झाले आहे.
भाजप, कॉंग्रेसमध्ये लॉबिंग
विशेषत: शिवसेनेने कॉंग्रेसशी चर्चा केली आहे. शिवसेनेची राज्यसभेसाठी 2 जागा आहेत, मात्र शिवसेनेने कॉंग्रेसची राज्यसभेची एक जागा घेऊन त्या बदल्यात विधान परिषदेत मदत करण्याची देवाण घेवाण झाली आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसच्या वाट्याच्या विधान परिषदेतील जागा वाढणार आहे. त्यासाठी आतापासूनच कॉंग्रेसमध्ये लॉबिंग सुरू झाले आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेवर भाजपचे चार जण सहज निवडून जाणार असल्याने या चार जागासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहेत. प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले आहे, मात्र आता उर्वरित तीन जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. या तीन जागांसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ, अनिल बोंडे, राम शिंदे, कृपाशंकर सिंग यांचीही नावे चर्चेत आहेत.
(हेही वाचा पेट्रोल-डिझेल इतक्या रुपयांनी होणार स्वस्त, केंद्र सरकारची मोठी घोषणा)
असे आहे जागाचे गणित
विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहे. त्यामुळे भाजपच्या सहज चार जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळेच आता या चार जागांसाठी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
Join Our WhatsApp Community