एकीकडे भारतातील काही शहरांचा पारा 45 अंशाच्या पुढे गेला आहे, तर काही ठिकाणे अशी आहेत जिथे तुम्ही जॅकेटशिवाय फिरू शकत नाही. त्यातील एक म्हणजे लेह-लडाख. मे-जून महिना येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे आणि आता IRCTC तुम्हाला लडाखला भेट देण्याची संधी देखील देत आहे. जाणून घ्या या संबंधित महत्त्वाची माहिती आणि पॅकेजबद्दल…
कसं असणार पॅकेज…
IRCTC चे लेह लडाख – बंगळुरू पॅकेज 5 जुलैपासून सुरू होत आहे. बंगळुरू येथून हा प्रवास सुरू होणार असून जे 11 जुलै 2022 रोजी संपणार आहे. IRCTC चे हे लेह-लडाख पॅकेज 6 दिवस आणि 7 रात्रीचे असणार आहे. IRCTC च्या भव्य लेह-लडाख एक्स-बंगलोर पॅकेजमध्ये लेह, नुब्रा व्हॅली, पॅंगॉन्ग लेक, शाम व्हॅली आणि तेर्तुकी समाविष्ट असणार आहे.
IRCTC चे हे पॅकेज घेऊन तुम्ही पूर्णपणे आरामशीर प्रवास करू शकतात. संपूर्ण ट्रिप दरम्यान नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण IRCTC द्वारे देण्यात येईल. याशिवाय राहण्याची संपूर्ण व्यवस्था केवळ IRCTC कडूनच केली जाईल. या सहलीत प्रेक्षणीय स्थळांचाही समावेश आहे. म्हणजे हे पॅकेज घेतल्यानंतर इकडे तिकडे फिरण्याची आणि खाण्यापिण्याची संपूर्ण जबाबदारी IRCTC ची असेल. तुम्हाला फक्त तुमचे सामान पॅक करायचे आहे आणि सर्व एन्जॉयमेंट साठी तयार राहायचे आहे.