पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आता 8 वर्ष पूर्ण होत आहेत. असे असतानाच आता मोदीच नंबर वन पंतप्रधान असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे. सी व्होटरद्वारे करण्यात आलेल्या IANS-C Voter Survey नुसार ही माहिती मिळत आहे. यामध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना जनतेने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदींपेक्षा कमी मते दिली आहेत.
मोदींना सर्वाधिक पसंती
2021 साली देशात अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या राज्यामध्ये सी व्होटरद्वारे एक सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये तामिळनाडू आणि केरळ ही राज्ये वगळता इतर सर्व ठिकाणी जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे. तर केरळ आणि तामिळनाडूमध्ये कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जनतेने मोदींपेक्षा जास्त पाठिंबा दिला आहे.
(हेही वाचाः सरकारी कर्मचा-यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय)
किती टक्के मते?
पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून तुम्हाला कोणता नेता योग्य वाटतो?, असा प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता. यावेळी आसाममधील 43 टक्के, केरळमधील 28 टक्के जनतेने मोदींना पंतप्रधान म्हणून प्राधान्य दिले आहे. तर तामिळनाडून 29.56, केरळमध्ये 49.69 टक्के लोकांनी मोदींच्या पारड्यात मत टाकले आहे. पश्चिम बंगालमध्ये 42.37 टक्के लोकांनी मोदींना आपला पाठिंबा दिला आहे.
गांधी, केजरीवाल आणि बॅनर्जींना अल्प प्रतिसाद
त्यामुळे या पाच राज्यांची आणि पुदुच्चेरीतील मतांची आकडेवारी एकत्र केल्यास मोदींना 49.91 टक्के लोकांनी आपली पसंती दिल्याचे कळते. तर या यादीत राहुल गांधी 10.1 टक्के, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 7.62 टक्के जनतेने पंतप्रधान पदाचे योग्य उमेदवार म्हणून मत दिले आहे. काँग्रेसच्या इतर नेत्यांना 5.46 टक्के तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 3.23 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे.
(हेही वाचाः महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेलचे हे आहेत नवीन दर)
Join Our WhatsApp Community