अन्न पदार्थ शिजवण्यासाठी घरात वेगवेगळ्या भांड्यांचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का… एखाद्या पदार्थाची पौष्टिकता ही भांड्यांवर सुद्धा अवलंबून असते. पदार्थ बनवताना जिन्नस ज्याप्रमाणे स्वच्छ करून घेतले जातात त्याप्रमाणे भांडी देखील स्वच्छ व उत्तम गुणवत्ता असलेली असणे गरजेचे असते.
पितळेच्या भांड्यात जेवण करण्यापूर्वी त्या भांड्याला कलही लावून घेणे गरजेचे असते तसेच लोखंडाच्या कढईत तयार केलेल्या अन्नपदार्थात लोह निर्माण होते. जे शरीरासाठी उपयुक्त असते. मात्र तयार झाल्यानंतर पदार्थ फार काळ लोखंडी कढाईत ठेवू नये. त्यामुळे भांडी खरेदी करण्यापूर्वी किंवा त्यामध्ये अन्नपदार्थ शिजवण्यापूर्वी योग्य ती माहिती जाणून घ्या अन्यथा यामुळे थेट शरीरावरही परिणाम होऊ शकतो.
भांडी खरेदी करण्यापूर्वी किंवा त्यामध्ये अन्नपदार्थ शिजवण्यापूर्वी योग्य ती माहिती जाणून घ्या
- चमकदार कोटिंग असलेली भांडी जास्त खरेदी करू नका ही, भांडी केवळ सर्व्ह करण्यासाठी वापरा.
- तांब्यामध्ये अन्नाची उष्णता दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची गुणवत्ता असते. परंतु तांब्यामध्ये खारट पदार्थ शिजवू नयेत. मिठात असलेले आडियन तांब्यावर त्वरीत प्रक्रिया करतात यामुळे तांब्याचे कण अधिक बाहेर पडतात त्यामुळे अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे.
- अॅल्युमिनियम मध्ये शिजवलेले अन्न शरीरासाठी घातक असते असे तज्ज्ञ सांगतात. अॅल्युमिनियम लवकर गरम होते आणि आम्लयुक्त भाज्या आणि खाद्यपदार्थांवर याचा परिणाम होतो म्हणून अॅल्युमिनियमच्या भांड्यांमधून स्वयंपाक करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. या रासायनिक अभिक्रियांचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.
- स्टेनलेस स्टीलची भांडी विकत घेण्यापूर्वी, त्यांची गुणवत्ता तपासा. नेहमी उच्च दर्जाची आणि टिकाऊ स्टेनलेस स्टीलची भांडी घ्या.
- लोखंडाच्या भांड्यात स्वयंपाक करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे कारण नैसर्गिकरित्या या भांड्यांमधून आपल्या शरीराला लोह मिळते.