राज्यसभेची निवडणुक येत्या 10 जुनला होणार आहे. राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा संभाजी राजे यांनी केली . संभाजीराजेंनी केलेल्या या घोषणेनंतर, आता शिवसेना पुरस्कृत उमेदवारी संभाजीराजेंना दिल्याची माहिती मिळत आहे. संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 35 मिनिटे भेटही घेतली. या भेटीनंतर संभाजी राजे शिवसेना पुरस्कृत उमेदवारी स्वीकारतील अशी माहिती समोर येत होती, आता यावर उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगतिले की, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. शिवसेना पुरस्कृत वगैरे कोणताही निर्णय नाही, असे संजय राऊत यांनी सांगतिले.
काय म्हणाले राऊत
आमची भूमिका हीच आहे की, दुसरा उमेदवार शिवसेनेचाच असेल, अद्याप यावर कुठलाही निर्णय झालेला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. अद्याप शिवसेना पुरस्कृत वगैरे असा कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच, यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा: शरीरातील या अवयवाचेही होते प्रत्यारोपण)
संभाजीराजेंच्या प्रस्तावावार उद्धव ठाकरे यांचे उत्तर
मुख्यमंत्री आणि संभाजीराजे या दोघांमध्ये जवळपास 35 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची सुत्रांनी माहिती दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून, अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला होता. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करुन कळवतो असे सांगितले होते.
Join Our WhatsApp Community