राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि मनसेचे नेते वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवल्यावर, साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर नाराज असल्याचे दिसून आले होते. मला पक्षातून डावललं जातंय. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. तसेच मी शेवटपर्यंत राजमार्गावरच राहणार, असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलं होतं. यानंतर रविवारी मनसेचा झेंडा हाती घेऊन घोषणा देत विविध कार्यकर्त्यांसह वसंत मोरे सभेस्थळी दाखल झाले. आता त्यांनी सभेनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
साहेबांच्या तब्बेतीचा विषय महत्वाचा
अजून नाराज आहात का? असा प्रश्न विचारताच वसंत मोरे यांनी हसत आपलं मत व्यक्त केलं आहे. “घरातली भांडणं आहेत… ती बसून जर कोणाला वाटत असेल खरंच मिटवायची तर बसून बोलतील आणि मिटेल सर्व” असं म्हटलं आहे. वसंत मोरे यांच्या मनात अजून नाराजी आहे का? य़ावर बोलताना “नाराजी असण्याचं काही कारण नाही. जे आहे ते आहे. मी काल सांगितलं मला जे बोलायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं ते मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झालो. दखल घेतली नाही तर घ्यायला लावू. साहेबांच्या तब्येतीचा विषय हा सर्वात महत्त्वाचा आहे. घरातली भांडणं आहेत… ती बसून जर कोणाला वाटत असेल खरंच मिटवायची तर बसून बोलतील आणि मिटेल सर्व” असे वसंत मोरे म्हणाले.
( हेही वाचा: संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवारीवर राऊतांनी दिले उत्तर म्हणाले….)
Join Our WhatsApp Community