हापूस ॲग्रो टुरिझमच्या वतीने तोणदे (ता. रत्नागिरी) येथे तीन दिवसांच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या समरचा कॅम्पचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या आगळ्या-वेगळ्या स्पर्धांमध्ये पाच मिनिटांत साडेपाच आंबे खाऊन एका मुलाने कमी वेळात आंबे खाण्याची स्पर्धा जिंकली.
( हेही वाचा : ‘बेस्ट’चे स्टेअरिंग महिलांच्या हाती! पहिल्यांदाच महिला बसचालकाची नियुक्ती )
तीन दिवसांच्या या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व मुलांनी प्रत्यक्ष आंबे काढण्याचा अनुभव सुद्धा घेतला. उत्कृष्ट भोजनाबरोबर निसर्गामध्ये राहण्याचा नवा अनुभव मुलांनी घेतला. रस्सीखेच, स्विमिंग, जंगल सफारी अशा विविध साहसी खेळांचे आयोजन सुद्धा केले होते. कॅम्पमध्ये तिसऱ्या दिवशी आंबा खाण्याची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तोणदे येथील हापूस ॲग्रो टुरिझमचे दीपक ऊर्फ बंधू नागवेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आंबे खाण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
- मंथन मालगुंडकर ( साडेपाच आंबे पाच मिनिटांत)
- द्वितीय क्रमांक : हिमानी कीर चार आंबे)
- तृतीय क्रमांक : राज घाणेकर (साडेतीन आंबे)
कार्यक्रमाला शाबासकी देण्यासाठी तोणदे गावचे सरपंच सचिन भुवड, तोणदे देवस्थान अध्यक्ष महेश महाकाळ, उद्योजक प्रकाश लिमये, सामाजिक कार्यकर्ते विनय फळणीकर आणि आयोजक बंधू नागवेकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community