पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिल महिन्यातील ‘मन की बात’ भागावर एक डिजिटल पुस्तिका प्रदर्शित केली. ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मला पुढील आठवड्यात होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमाबद्दल असंख्य सूचना येत आहेत. तरूण त्यांची मते मोठ्या प्रमाणावर व्यक्त करत आहेत, याचा मला आनंद आहे. गेल्या महिन्याच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाविषयी एक पुस्तिका प्रसिद्ध करत आहे. त्यामध्ये कार्यक्रमात चर्चा करण्यात आलेल्या अनेक रोचक गोष्टींविषयीच्या लेखांचा समावेश आहे.”
I’ve been getting numerous inputs for the #MannKiBaat programme next week. Happy to see youngsters share their views in large numbers. Here is a booklet on last month’s episode containing interesting articles on the topics discussed. https://t.co/ze3946Stwm
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2022
29 मे रोजी ‘मन की बात’
पंतप्रधान नरेंद मोदी रविवार 29 मे सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा 89 वा भाग असेल. 2022 वर्षाचा हा पाचवा भाग असणार आहे. नागरिक 26 मे पर्यंत ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी माय गोव्ह, नमो अप्लिकेशन किंवा 1800117800 क्रमांकाच्या माध्यमातून ध्वनिमुद्रित करून सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात.
(हेही वाचा – राऊतांनी सभेनंतर राज ठाकरेंना पुन्हा डिवचले, म्हणाले “राज ठाकरे वैफल्यग्रस्त अन्…”)
‘मन की बात’चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही ‘मन की बात’चे प्रसारण आयोजित केले जाते.
Join Our WhatsApp Community