सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) उड्डाणे प्रभावित झाली. अनेक उड्डाणांची दिशा वळवण्यात आल्याचेही वृत्त आहे.
दिल्ली विमानतळाच्या वेबसाइटनुसार, खराब हवामान आणि संबंधित कारणांमुळे 40 उड्डाणे सकाळी 9 वाजेपर्यंत उशीर झाली, तर दिल्लीला येणारी 18 उड्डाणांनाही उशीर झाला. दोन उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. खराब हवामानामुळे उड्डाणे प्रभावित झाल्याचे दिल्ली विमानतळाने ट्विट केले आहे. प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटच्या अपडेट्ससाठी संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्लीतील अनेक भागात वाहतूक कोंडी
दिल्लीकरांना अनेक भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दिल्लीच्या आयटीओ मध्ये पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे, तर पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
गुडगावमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस
दिल्लीला लागून असलेल्या गुडगांवमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. एका ट्विटर यूजरने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यावरून दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे, दिसून येते.
https://twitter.com/ravishjha/status/1528538417042104320?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1528538417042104320%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fmetro%2Fdelhi%2Fother-news%2Fdelhi-weather-news-rain-delhi-ncr-flight-service-affected-at-igi-latest-news%2Farticleshow%2F91732815.cms
दिल्ली विमानतळावरून बंगळुरूला जाणार्या ट्विटर युजर नीरा भारद्वाजने ट्विट केले आहे की, जेव्हा तुम्ही बेंगळुरूला जाण्यासाठी तयार असता, तेव्हा दिल्लीला त्या माजी प्रियकराप्रमाणे तुमची किंमत समजते. दिल्ली विमानतळावर मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
( हेही वाचा: राम मंदिराचे बांधकाम 2024 पर्यंत पूर्ण होणार नाही? हे आहे कारण )
#Delhi is behaving like that ex who realises your value just when you're about to leave it for #Bangalore! #DelhiRains #flightdelay pic.twitter.com/XhbEje0OCW
— Neera Bhardwaj (@Neerabha) May 23, 2022