अरबी समद्रापर्यंत पोहोचलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना आता पुढचा टप्पा गाठायला ब्रेक लागला आहे. मान्सून गेल्या तीन दिवसांपासून अरबी समुद्रात श्रीलंकेच्या वेशीवरच आहे. त्यामुळे भारतीय वेधशाळेचे २७ मे पर्यंत मान्सून केरळ गाठणार, हे भाकीत खरे ठरायला वरुणराजाने पुन्हा आव्हान निर्माण केले आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा २८ मे पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा! )
नैऋत्य मोसमी वारे २७ मे पर्यंत केरळात दाखल होतील, असा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तवला आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असानी या वादळामुळे अंदमान समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण झाले होते. १६ मे रोजी अंदमानात मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय वेधशाळेने केली. त्यानंतर पाच दिवसांत मान्सूनने अरबी समुद्रात प्रवेश केला. आता असानी चक्रीवादळामुळे मान्सूनला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले वातावरणातील बाष्प संपले आहे. परिणामी, मान्सून पुढे सरकण्यास फारशी अनुकूल परिस्थिती नसल्याची माहिती हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी दिली. मान्सूनला श्रीलंकेपर्यंत जाण्यासाठी २६ मे पर्यंतची तारीख उजाडेल, असा नवा अंदाज हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी व्यक्त केला. त्यामुळे केरळची किनारपट्टी गाठायला वरुणराजा कोणत्या तारखेचा मुहूर्त गाठेल, हे आता निश्चित सांगणे अवघड झाले आहे.
Join Our WhatsApp Community