राणीबागेत आजपासून ‘शिवा’ अस्वलचे घडणार दर्शन

141

मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या ‘व्हर्च्युअली वाईल्ड’ या आभासी सफरीच्या मालिकेच्या पाचव्या भागाचे अनावरण महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते सोमवारी २३ मे २०२२ रोजी करण्यात आले.

‘सेल्फी पॉईंट’चेही लोकार्पण

तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील ‘सेल्फी पॉईंट’चेही लोकार्पण करण्यात आले. मुंबई प्राणिसंग्रहालयात नवीन आणलेले नर अस्वल (शिवा) यालाही प्रदर्शनी पिंजऱ्यात यावेळी सोडण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांसह पर्यटकांना या नवीन पाहुण्याला पाहता येणार आहे.

(हेही वाचा – ज्ञानवापी मशिदीच्या वादादरम्यान ‘या’ राज्यात आढळले मशिदीखाली मंदिरं)

शतकोत्तर हीरक महोत्सव वेगवेगळ्या कार्यक्रमातून साजरा

१९ नोव्हेंबर १८६२ रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी या ऐतिहासिक घटनेला तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला १६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमातून साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.